जसे पेराल तसेच उगवेल 


तुम्ही लोकांना संकटात मदत करा
हजारो हात येतील तुम्हास मदतीस जेव्हा तुम्ही असाल संकटात
यालाच म्हणतात जसे पेराल तसेच उगवेल !

तुम्ही लोकांना यशाचा मंत्र  शिकवा
ते करतील तुमच्या यशाची विधात्त्याकडे कामना
यालाच म्हणतात जसे पेराल तसेच उगवेल !

तुम्ही  निराधाराचा व्हा आधार
जीवनात कधीच होणार नाहीत तुम्ही निराधार
यालाच म्हणतात जसे पेराल तसेच उगवेल !

तुम्ही भुकेल्याला अन्न द्या
अन्नदेवता असेल कायमची तुमच्यावर प्रसन्नः
यालाच म्हणतात जसे पेराल तसेच उगवेल

तुम्ही दुसराला आनंद द्या
दुखा:ची सावली नाही पडणार तुमच्या आयुष्यावर
यालाच म्हणतात जसे पेराल तसेच उगवेल !

तुम्ही लोकांस मान सन्मान द्या
दुसरे होतील तुमच्या समोर विनम्र
यालाच म्हणतात जसे पेराल तसेच उगवेल !

तुम्ही लोकांचा द्वेष करा
 लोक पाहतील तुम्हाला  पाण्यात
  यालाच म्हणतात जसे पेराल तसेच उगवेल !
जसे पेराल तसेच उगवेल !!

© महेश भा. रायखेलकर 

Comments

Popular posts from this blog