वृद्धाश्रम

कारे धाडिशी त्यांना तु वृद्धाश्रमास
विसरलास का तु त्यांच्या श्रमास
असा कसा निघालास तु रे करंटा
स्वप्नांवर  त्यांचा  तु  फिरवी वरवंटा

काय असे त्यांचे मोठे मागणे
दोन गोड शब्द  आणी  दुखण्याचे गाराहने
विसरलास का तु  त्यांचे उपकार
ज्यावर  त्यांनी नाही लावला  कुठलाही  कर

कसे फेडशील  त्यांचे  तु पांग
जबाबदारीतुन  काढीशी तु अंग
करून त्यांची अशी अधोगत्ती
कशी साधणार रे तु स्वत: ची प्रगती

आठव त्यांचे  हात पकडुनी
आलास तु  इथवर पायरी चढुनी
असा कसा विसरलास आईची अंगाई
बापाची खात होतास फुकट कमाई

तूच आहेस  त्यांचे कीरे प्राण
काय करी असा त्यांचा अपमान
घेशी कसा ऋणातुन मुक्तता करून
गेलास तु नुसता मातुन

नाही कसा रे आज तुला वेळ
तूझ्याचसाठी खर्चिला त्यांनी सारा भूतकाळ
आधार तुझारे त्यांना पाहीजे आज
एवढा कशाचारे आला  तुला माज

होशील  कधीतरी  तुही म्हातारा
नाही त्यावर  काहीच उतारा
करुनी त्यांचे असे हाल
कसा   होणार तु मालामाल

पाहून तुझे हे संस्कार
करतील तुझी मुले  तूझ्यावरच  वार
कळेल त्येव्हां आपलाच बाळ
कसा होतो  आपलाच काळ
कसा होतो  आपलाच काळ

©  महेश भा. रायखेलकर


   





  

Comments

Popular posts from this blog