Posts

Showing posts from June, 2020
Image
कोरोना एक आपत्ती आली कोरोनाची आपत्ती जगाची झाली कुंठीत मती  माणसाने खाल्ल्या  निसर्गाच्या जाती  अती  तेथे होते माती  कशाला घाबरून जायचे  ताजे अन्नच खायचे  हात सदा धुवायचे  गर्दीत जायचे टाळायचे  झेलली अशी आपण अनेक संकटे  कधी पूर कधी दुष्काळाचे काटे  कोरोनाचे संकट ना छोटे  जनमानसात भीती दाटे  नका अफवा पसरू  एक मेका सावरू  माणुसकीचे बीज पेरू  कोरोनावर मात करू  कोरोनावर मात करू  महेश भा रायखेलकर
Image
   चिऊताई चिऊताई.... चिऊताई ए चिऊताई तुझ्या चिवचिव ची सनई  प्रत्येक आई लहान बाळास  गाई तुझ्या नावाने अंगाई  ओळख तुझी लहानपणीची  आता नुसतीच आठवायची  घरटी तुझी झाडावरची  आता तुरळक दिसायची  सिमेंट च्या जंगलाने  संपले तुझे मंजुळ गाणे  केली खूप प्रगती माणसाने  विसरले निसर्गातच आहे सोने  ये परत फिरून तू चिऊताई नको करुस जाण्याची तू घाई  आतुर झाले कान ऐकण्या  तुझ्या चिवचिवाटीची सनई  महेश भा. रायखेलकर 
Image
कोरोनाने आम्हाला खूप काही शिकवलं कोरोना एक जागतिक महामारी. जगावर आलेले अकस्मात संकट. आजपर्यंत अनेकजण या आजारातून बरी झाली, काहींचे दुर्देवी मृत्यू  झाले व काहीजण आजही यावर उपचार घेत आहेत. या कोरोनाने आम्हाला खूप काही शिकवलं. या महामारीवर जालीम उपाय म्हणून लॉकडाऊन केला गेला तोहि तब्बल दोन ते अडीच महिने. या काळात सर्वजण घरीच होते. या काळात आपल्याला घराचं महत्व जास्त चांगल्या प्रकारे कळालं. घरातील माणसांना वेळ देण्याचे महत्व याच काळाने आपल्याला शिकवलं. घरातील बायकांना विशेषतः आपल्या पत्नीला दिवसभर किती काम असते हे प्रत्येकाने जवळून अनुभवलं. घरकाम हे फक्त बायकांचेच काम आहे हा गैरसमज काही पुरुष मंडळींनी घरकामात हातभार लावून मोडला. हा हातभार पुढे देखील जमेल तसा लावण्यास कोणतीही हरकत नाही. पैसा साठविण्याचे महत्व कळाले. कारण असा साठविलेला पैसाच आपल्याला या संकटात मदतीला आला. घरी कामाला येणा-या नोकर चाकाराचे महत्व त्याचे श्रम लक्षात आले. स्वालंबनाचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले.  सर्व बंद होते तरी या काळात पोलीस यंत्रणा, मेडिकल यंत्रणा, सफाई यंत्रणा, जीवनावश्यक वस्तू पुरव...
Image
  मन ओळखावं  तुला जसं कौतुक हवंसं असतं तसं इतरांना  ते काही नकोसं नसतं म्हणून फक्त एकच  करावं जरा दुस-याच मन ओळखावं ! तुला जसा मान दिला कि तू सुखावतो तसेच  इतरांना देखील मान हवासा असतो म्हणून फक्त एकच  करावं जरा दुस-याच मन ओळखावं ! जसं तुला कॊणी दुःखात आधार द्यावासा वाटतो तसंच  इतरांना असा  दिलेला आधार  नकोसा नसतो म्हणून फक्त एकच  करावं जरा दुस-याच मन ओळखावं ! जसं तुला शुभेच्छा हव्या हव्याशा वाटतात तसंच  इतरांना देखील दिलेल्या शुभेच्छा  आवडतात म्हणून फक्त एकच  करावं जरा दुस-याच मन ओळखावं ! तुला जसा अपमान सहन होत नाही तसंच अपमानाने  इतरही  दुःखी होतात म्हणून फक्त एकच  करावं जरा दुस-याच मन ओळखावं ! तुला जसा अतिश्रमाचा त्रास होतो तसाच  इतरही अतिश्रमाने दमून जातात म्हणून फक्त एकच  करावं जरा दुस-याच मन ओळखावं ! जसं तुला कॊणी तुझ्या खाजगी आयुष्यात डोकावलं कि चालत नाही तसंच  इतरांना द...