कोरोनाने आम्हाला खूप काही शिकवलं कोरोना एक जागतिक महामारी. जगावर आलेले अकस्मात संकट. आजपर्यंत अनेकजण या आजारातून बरी झाली, काहींचे दुर्देवी मृत्यू झाले व काहीजण आजही यावर उपचार घेत आहेत. या कोरोनाने आम्हाला खूप काही शिकवलं. या महामारीवर जालीम उपाय म्हणून लॉकडाऊन केला गेला तोहि तब्बल दोन ते अडीच महिने. या काळात सर्वजण घरीच होते. या काळात आपल्याला घराचं महत्व जास्त चांगल्या प्रकारे कळालं. घरातील माणसांना वेळ देण्याचे महत्व याच काळाने आपल्याला शिकवलं. घरातील बायकांना विशेषतः आपल्या पत्नीला दिवसभर किती काम असते हे प्रत्येकाने जवळून अनुभवलं. घरकाम हे फक्त बायकांचेच काम आहे हा गैरसमज काही पुरुष मंडळींनी घरकामात हातभार लावून मोडला. हा हातभार पुढे देखील जमेल तसा लावण्यास कोणतीही हरकत नाही. पैसा साठविण्याचे महत्व कळाले. कारण असा साठविलेला पैसाच आपल्याला या संकटात मदतीला आला. घरी कामाला येणा-या नोकर चाकाराचे महत्व त्याचे श्रम लक्षात आले. स्वालंबनाचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले. सर्व बंद होते तरी या काळात पोलीस यंत्रणा, मेडिकल यंत्रणा, सफाई यंत्रणा, जीवनावश्यक वस्तू पुरव...