गजल वृत्त : वियदगंगा... ( लगागागा लगागागा लगागागा लगागागा) मला काही कळेना, तू अशी भीतेस कोणाला तुझा मी श्वास आहे, रोज सांगावेस कोणाला जगावे ते तुझ्यासाठी मरावे ते तुझ्यासाठी मला सोडून का तू गोड बोलावेस कोणाला कधीही कोणताही कायदा मी मोडला नाही कशाला तू तरी वर्दीतल्या भ्यांवेस कोणाला अरे बाबा कधीही तूच आखावेस भाग्याला कशाला कुंडली दोषास भेटावेस कोणाला तुला जे पाहिजे देवास मागावेस केव्हाही उगाची तू कशाला सांग पूजावेस कोणाला © महेश भा. रायखेलकर