अपॆक्षा
खा, खा म्हणून किती खाणार रे घोटाळेबाजांनो
जनाची नाहीतर मनाची थोड़ी लाज वाटली पाहिजे
भाषा, प्रांत, धर्म, जात भेद सारे विसरुनी
'भारतीय' बनुनी या देशात सर्वांनी राहिले पाहिजे
नुकतेच यशाची स्वप्ने पाहू नकोस रे तू
याकामी प्रयत्नांची पराकाष्टा केलीस तू पाहिजे
जे हात शिवतील आमच्या आया-बहिणींच्या अब्रूला
ते हात मुळातून कलम केलेत पाहिजे
नवस सायास गंडे दोरे बांधून उपयोग काय
देवाठायी मनात भक्तीचा भाव असला पाहिजे
सूर्याची प्रखरता अंगी असून भागणार नाही
चंद्राची शीतलता अंगी भिनवली पाहिचे
सरकारच सर्व काही करणार म्हणून चालणार नाही
आपलेही थोडे काही योगदान देशापायी असले पाहिजे
© महेश भा. रायखेलकर

Comments
Post a Comment