लोक काय म्हणतील ? लोक काय म्हणतील म्हणून कधी खळखळून हसलो नाही लोक काय म्हणतील म्हणून दुःखातही मनमोकळे रडलो नाही ! लोक काय म्हणतील म्हणून कधी कोणाच्या प्रेमात पडलो नाही लोक काय म्हणतील म्हणून कधी कडकडून कोणाशी भांडलोही नाही ! लोक काय म्हणतील म्हणून बेधूंद होवून नाचलो नाही लोक काय म्हणतील म्हणून कधी एखादं गाणं गायलो नाही ! लोक काय म्हणतील म्हणून पावसात ओलेचिंब होवून भिजलो नाही लोक काय म्हणतील म्हणून मुलांसोबत कधी दंगामस्ती करत खेळलो नाही ! लोक काय म्हणतील म्हणून एखादया छंदात गुंतलो नाही लोक काय म्हणतील म्हणून कधी कोणत्या फंदातही पडलो नाही ! लोक काय म्हणतील म्हणून वेडे धाडस कधी केले नाही लोक काय म्हणतील म्हणून कधी कोणते साहस केले नाही ! लोक काय म्हणतील म्हणून कधी फॅशन केली नाही लोक काय म्हणतील म्हणून कधी जास्त पैसे खर्च केले नाहीत ! लोक काय म्हणतील म्हणून कधी कसली हौस केली नाही लोक काय म्हणतील म्हणून कोणतीही मौज केली नाही ! लोक का...