आली आली  दिवाळी 

आली आली दिवाळी
आनंदाची ती मांदियाळी
अंगणात असेल सुबक रांगोळी
करुया अभ्यंगस्नान उठून  पहाटेच्या वेळी !

चिवडा- लाडू, शेवचा असेल बेत खास
त्यावर खमंग चकल्याची रास
करंजी, अनारसे, शंकरपाळी  असतील सोबत
घरोघरी फराळाची  तयारी चालू जोरात !

फटाक्यांची होईल अतिषबाजी
बालगोपाल नाचतील  उडवीत फुलबाजी
प्रकाशाचा असेल लखलखाट
उटणं ,अत्तर,साबणाच्या सुगंधाची पसरेल  लाट !

वस्त्र,अलंकाराची असेल रेलचेल
पाहुण्यांची आगमनाची लागेल चाहूल
बहिण ओवाळील भाऊरायास
पती-पत्नी साठी पाडवा दिवस खास !

लक्ष्मी चे केले जाईल पूजन
वडीलधारी  देती आशिर्वाद करता, त्यांना नमन
आप्त मित्र भेटतील एकमेकांना
देतील आनंदाचा नजराणा एक दुस-यांना !

सौख्य,आनंद, आरोग्य संपन्न जावो ही दिवाळी
ज्ञान-प्रकाशाने उजळूया अज्ञानाची रात्र काळी
सर्वजण मिळून करू हा सण  साजरा
चहू  दिशा उधळू आनंद सारा !
चहू  दिशा उधळू आनंद सारा  !!

© महेश भा.   रायखेलकर



Comments

Popular posts from this blog