माझी बहीण बहीण 

माझी बहीण बहीण
आम्हां  भावंडातील ती 'वीण'
कीती जरी काम केले 
चेह-यावर नसे तिच्या 'शीण' !
माझी बहीण बहीण
सरले तिच्या सोबत लहानपण
तिच्या मायेचे जन्मभर
असे माझ्यावर ऋण !
माझी बहीण बहीण
एका घरची मुलगी,  दुस-याची सून
मागणे देवाकडे एकच
रहावी सदा सुखातं , हसूनं  !
माझी बहीण बहीण
बांधे राखी अन ओवाळे मज
जगाच्या पाठीवर यासम
बंधन नसे कुठले दूज !
माझी बहीण बहीण
सदा तत्पर करायला मदत
तिच्या शिवाय अपूर्ण
कोणत्याही सोहळ्याचा क्षण !
माझी बहीण बहीण
राहावी नात्याची  भक्कम आणं 
न होणार कुठल्याही परिस्थितीत
नाते हे आमचे क्षीण !
माझी बहीण बहीण
जोपर्यंत कुडीत  माझ्या प्राण
करेल कोणत्याही संकटापासून
तीचे सदाच मी रक्षण !
तीचे सदाच मी रक्षण!!


© महेश  भा. रायखेलकर 







Comments

Popular posts from this blog