जीवन गीत

झाले गेले सारे विसरून जाऊया
जीवनाचे  गीत पुन्हा गाऊया

किती दिवस मनात कुढणार
शरीराचे किती हाल करणार
काही गोष्टी नशिबावर सोडूया
आत्ताचा क्षण भरभरून जगूया

एखादी गोष्ट आपल्या हातात नसते
जे व्हायचे ते शेवटी होतच असते
भविष्याची चिंता करणे आज सोडूया
वर्तमानाचा  पूर्णपणे आनंद लुटूया

प्रत्येक बाब मनासारखी न होणार
काही चांगले तर काही वाईटही घडणार
चांगल्या कर्मावर विश्वास ठेऊया
बाकीचा भार सारा देवावर सोपवूया

इच्छांना कोणतीच मर्यादा नसते
मनाला थोडे आवरायचे असते
हलकं हलकं होता येईल का हे पाहूया
पतंगा सारखे हवेत मजेत उडूया

झाले गेले सारे विसरून जाऊया
जीवनाचे  गीत पुन्हा गाऊया

© महेश भा.  रायखेलकर 

Comments

Popular posts from this blog