महाराष्ट्र माझा भवानी माता जेथे वसती तो महाराष्ट्र माझा विठ्ठल उभा जिथे विटे वरती तो महाराष्ट्र माझा! शिवाजी ची जन्मभूमी तो महाराष्ट्र माझा संताची जी कर्मभूमी तो महाराष्ट्र माझा! फुले-आंबेडकरांना जेथे पूजती तो महाराष्ट्र माझा गौरी-गणपती ची जेथे भक्ती तो महाराष्ट्र माझा ! वेरुळ-अजिंठा लेण्यांची जेथे महती तो महाराष्ट्र माझा शाहीर जेथे पोवाडे गाती तो महाराष्ट्र माझा ! गान कोकिळा जेथे राहती तो महाराष्ट्र माझा क्रिकेटच्या देवाची जेथे वस्ती तो महाराष्ट्र माझा ! तालमीत जेथे चाले कुस्ती तो महाराष्ट्र माझा फडावर लावण्यांची जेथे मस्ती तो महाराष्ट्र माझा ! मराठी आहे जिथे माऊली तो महाराष्ट्र माझा सह्याद्री ची जिथे पडे सावली तो महाराष्ट्र माझा ! तारे-तारकांची जिथे मायानगरी तो महाराष्ट्र माझा साहित्यात ज्ञानपीठाची भरारी तो महाराष्ट्र माझा शिक्षणाची जिथे असे गंगोत्री तो महाराष्ट्र माझा उद्योगधंद्याची जेथे जंत्री तो महाराष्ट्र माझा ! देशाच्या राजकारणात ज्याने उमटविला ठसा तो महाराष्ट्र मा...