सुर्यपुत्र 

असुनी खरा मी सुर्याचा पुत्र
जन्मभर हिणवले म्हणूनी सूतपुत्र !

कुंतीने मला जन्मतः त्यागिला
राधिका मातेने सांभाळ माझा केला !

शोण लहान बंधू वृषाली असे पत्नी
दुय्रोधनाने गौरविले करुनी अंगदेशीचा अधिपती !

दुय्रोधन मित्राचे माझ्यावर फार उपकार
मृत्युचे दान देवुन मी ते फेडणार !

कृष्ण म्हणे माझी बाजु आहे अधर्म
खाल्या मिठाला जागणे हाच माझा धर्म !

या युगातला मी श्रेष्ठ धनुर्धारी
गांडीव जरी असले अर्जुनाच्या करी !

कवचकुंडलाचे मला वरदान
इंद्र प्रत्यक्ष मागतो त्याचे दान !

राहिलो असतो बनुनी पांडवाचा जेष्ठ भ्राता
भाग्यासमोर दीन  मी जरी मी श्रेष्ठ दाता !

पदरात टाकीयेले नियतीने असे चुकीचे  दान
जन्मभर करावी लागली  अधर्माची पाठराखण !

परशुरामाच्या शापाचा असे मी धनी
युद्धात रथाचे चाक  गिळे धरणी !

सोड सोड अर्जुना सोड रे बाण
कृष्णासमोर मृत्यु येणे हा भाग्याचा क्षण !
कृष्णासमोर मृत्यु येणे हा भाग्याचा क्षण !!


© महेश भा.  रायखेलकर 


Comments

Popular posts from this blog