आत्महत्या

काय करतोस असा वेड्या स्वत:चाच खात्मा
क्षमा नाही करणार तुला कधीच तो परमात्मा

अकाली जाण्याने तुझ्या तुझे करतील आकांत
कसे करशील वेड्या त्यांना तु शांत

जीवनापेक्षा कुठल दुख: नाही की रे  मोठं
कारे करतोस वेड्या आयुष्य तुझं हे छोट

जन्म मृत्यू  वेड्या आहे देवाच्या की रे हाती
करतोस कशाला सर्वस्वाची तु माती

तुझ्या जाण्याने ने रे वेड्या कुठले सुटणार नाहीत प्रश्न
तुझे सखेसोयरे होतील मात्र सुन्न

सोड सोड रे वेड्या असा हा अविचार
मरण्या पेक्षा जगण्याचा करी तु विचार
मरण्या पेक्षा जगण्याचा करी तु विचार


© महेश भा.  रायखेलकर



Comments

Popular posts from this blog