मी जबाबदार

माझ्या आनंदाला मी जबाबदार 
माझ्या दुःखालाही मीच जबाबदार 

माझ्या यशाला मी जबाबदार 
माझ्या अपयशाला सुद्धा मीच जबाबदार 

माझ्या मानाला मी जबाबदार 
माझ्या अपमानाला देखील मीच जबाबदार 

माझ्या श्रीमंतीला मी जबाबदार 
माझ्या गरिबीलाही  मीच जबाबदार 

माझ्या  शांततेला  मी जबाबदार 
माझ्या संतापाला सुद्धा  मीच जबाबदार 

माझ्या निरोगीपणाला मी जबाबदार 
माझ्या आजारपणाला देखील मीच जबाबदार 

माझ्या ज्ञानाला मी जबाबदार 
माझ्या अज्ञानालाही  मीच जबाबदार 

माझ्या उत्साहाला मी जबाबदार 
माझ्या निराशेला सुद्धा  मीच जबाबदार 

माझ्या नम्रपणाला  मी जबाबदार 
माझ्या अहंकाराला देखील मीच जबाबदार 

जीवनातील प्रत्येक घटनेला मी आणि मीच जबाबदार 
 कारण , मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार 
मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार 

(महेश भा. रायखेलकर)





Comments

Popular posts from this blog