Posts

Showing posts from 2021
Image
  मी जबाबदार माझ्या आनंदाला मी जबाबदार  माझ्या दुःखालाही मीच जबाबदार  माझ्या यशाला मी जबाबदार  माझ्या अपयशाला सुद्धा मीच जबाबदार  माझ्या मानाला मी जबाबदार  माझ्या अपमानाला देखील मीच जबाबदार  माझ्या श्रीमंतीला मी जबाबदार  माझ्या गरिबीलाही  मीच जबाबदार  माझ्या  शांततेला  मी जबाबदार  माझ्या संतापाला सुद्धा  मीच जबाबदार  माझ्या निरोगीपणाला मी जबाबदार  माझ्या आजारपणाला देखील मीच जबाबदार  माझ्या ज्ञानाला मी जबाबदार  माझ्या अज्ञानालाही  मीच जबाबदार  माझ्या उत्साहाला मी जबाबदार  माझ्या निराशेला सुद्धा  मीच जबाबदार  माझ्या नम्रपणाला  मी जबाबदार  माझ्या अहंकाराला देखील मीच जबाबदार  जीवनातील प्रत्येक घटनेला मी आणि मीच जबाबदार   कारण , मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार  मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार  (महेश भा. रायखेलकर)
Image
  कथा : -  क्रांती   आपल्या लेकीला विशेष कामगिरी बजावल्याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते पदक मिळाल्याचा आनंद व अभिमान सरदेशमुख दाम्पत्याचा  चेहऱ्यावरून  ओसंडून वाहत होता. स्वानंद पण आपल्या लहान बहिणीच्या या कर्तृत्वावर जाम खूष  होता . औरंगाबाद  येथे  पहिल्यादांच  पोलीस आयुक्त या पदावर  रुजू झाल्यानंतर विदेशी पर्यटक व काही स्थानिक यांचे संगमतीने चालत असलेले  ड्रग रॅकेट उध्वस्त करून अनेक तरुणांचे जीवन उध्वस्त होण्यापासून तीने  वाचवले होते. याच कामगिरी बद्दलचे  हे  पदक होते.  लेकीचे हे कौतुक पाहतानाच  सरदेशमुख दाम्पत्याचे मन गत काळात गेले. पोलीस आयुक्त असलेल्या आपल्या क्रांती सरदेशमुख या लेकीने ती १० वी मध्ये शिकत असतांना "तुम्ही मला नाव दिलंत मी हे नाव एका उंचीवर नेऊन ठेवेन " हे बोल खरे करून दाखविले  अनाथ आश्रमातून १ वर्षाच्या क्रांतीला आणतांना ती एवढया  मोठया पदावर जाईल व अशी कामगिरी बजावेल असे तेव्हा वाटले देखील नव्हते. त्यांच्या कुटूंबात एवढया मोठ...
Image
  मर्द को दर्द नही होता 'मर्द को दर्द नही होता' अमिताभच्या  एका हिंदी चित्रपटातील गाजलेला डायलॉग. हाच   डायलॉग मला एका डॉक्टरांनीही ऐकवला बहुतेक तेही  अमिताभ प्रेमी असावेत जेव्हा मी त्यांच्याकडे मागे एकदा एका शाररिक पीडेच्या  उपचारासाठी गेलो होतो. खरच मर्द म्हणजे पुरुषाला दुःख होत नाही? तो माणूस नाहीये ? त्याला हृद्य, मन  नाहीये ? . निर्सगतः  स्त्री  हि कोमल मनाचीच  व पुरुष हे  कणखर मनाचेच   अशी स्त्री व पुरुषाची व्याख्या केली आहे. कदाचित शारीरिक क्षमतेचा त्याचा पाया असेल. एखादा पुरुष रडायला लागला कि 'काय बायकासारखा रडतो' अशी त्याची हेटाळणी केली जाते. तो कोणत्या गोष्टीला भीत असेल तर काय 'बायकासारखा भितो' असे शब्द त्यास ऐकवले जातात. म्हणजे भीती, वेदना, दुःख, निराशा या भावना मोकळेपणाने व्यक्त पुरुषाने करावयाच्या नाहीत असा अलिखित  नियम घालून दिला गेला आहे .  बिचारा पुरुष बाकी कोणते नियम एखादयावेळेस मोडेल पण हा नाही व वर त्याला फिल्मी डायलॉगचे  आवरणं पण घालेल 'मर्द को दर्द नही होता'....
Image
  सोबत करते माझी कविता  मी एकटा कधीच नसतो  सोबत करते माझी कविता  मला हसविते, मला रडविते  मी रुसलो कि तीही रुसते  मी एकटा कधीच नसतो  सोबत करते माझी कविता  मला खुणविते , मला विनविते मी फुललो कि तीही फुलते  मी एकटा कधीच नसतो  सोबत करते माझी कविता  मला मिरवीते, मला झुरविते  मी थांबलो कि तीही थांबते  मी एकटा कधीच नसतो  सोबत करते माझी कविता  मला उसविते , मला शिणविते  मी भिडलो कि तीही भिडते  मी एकटा कधीच नसतो  सोबत करते माझी कविता  मला शिकविते, मला जागविते  मी  भुललो कि तीही भुलते  मी एकटा कधीच नसतो  सोबत करते माझी कविता  सोबत करते माझी कविता 
Image
  गुलमोहर रणरणत्या उन्हात फुलतो गुलमोहर त्याच्या जगण्याची पसरावी चहूकडे लहर लाल-पिवळी फुले दिसतात सुंदर निसर्गाला आपली न लागावी नजर सावली गुलमोहराची किती अल्हाददायक उन्हातल्या रस्त्यावरच्या वाटसरूंना उपकारक मनातल्या स्वप्नांचा  फुलावा गुलमोहर सदाच असावी ! आशादायक नजर !! सदाच असावी ! आशादायक नजर !!   ©  महेश भा. रायखेलकर