गुलमोहर
रणरणत्या उन्हात
फुलतो गुलमोहर
त्याच्या जगण्याची
पसरावी चहूकडे लहर
लाल-पिवळी फुले
दिसतात सुंदर
निसर्गाला आपली
न लागावी नजर
सावली गुलमोहराची
किती अल्हाददायक
उन्हातल्या रस्त्यावरच्या
वाटसरूंना उपकारक
मनातल्या स्वप्नांचा
फुलावा गुलमोहर
सदाच असावी !
आशादायक नजर !!
सदाच असावी !
आशादायक नजर !!
© महेश भा. रायखेलकर
रणरणत्या उन्हात
फुलतो गुलमोहर
त्याच्या जगण्याची
पसरावी चहूकडे लहर
लाल-पिवळी फुले
दिसतात सुंदर
निसर्गाला आपली
न लागावी नजर
सावली गुलमोहराची
किती अल्हाददायक
उन्हातल्या रस्त्यावरच्या
वाटसरूंना उपकारक
मनातल्या स्वप्नांचा
फुलावा गुलमोहर
सदाच असावी !
आशादायक नजर !!
सदाच असावी !
आशादायक नजर !!
© महेश भा. रायखेलकर
.jpg)
Comments
Post a Comment