Posts

Showing posts from September, 2017
Image
माझ्या हायकू कविता  मी बांधले शब्दांचे इमले लगेच कोसळले ************** तुझ्यात आहे काही तरी जादु कशी भेदु *************** देव काय बसल्याजागी देणार कसे होणार ***************** म्हणे मी देव पाहिला तुलाच कसा दिसला ****************** हसण्यावरी नेऊ नकोस माझी गोष्ट फारच शिष्ट **************** कोणत्याही कामाला फार वेळ दयावा लागतो मी कंटाळतो **************** सतत कंटाळा तुला कसा येतो कामाचा नाही लळा ******************* तो आहे कामाचा माणुस आहे खास ******************* एकतर प्रगती काहीच नाही नुसती अधोगती ****************** मी आहे एक कलाकार कशाची फिकीर ***************** ©  महेश भा. रायखेलकर
Image
काही हायकू सगळं तुझ्या लक्ष्यात येईल जेव्हा मी सांगेल ************ अशी कोडयात बोलू नको सांग स्पष्ट शब्दात ************** आपण पाहतो तस जग असतं चूक आपल्या नजरेत ***************** एक तर काहीच बोलत नाहीस का टाळतेस ? ****************** दुस-याचा वापर करू नये फुटेल खापर ***************** आई-वडिलांची सेवा करा पुण्य भरा ***************** स्त्री ला कमी लेखू नका येईल सुनामी ***************** वचन दिले ते पाळावे करून दाखवावे ***************** कर्ता करविता तो मी फक्त निमित्तमात्र जगातील एक पात्र **************** नको अशी भिऊन तू जाऊस सांभाळून घेईन *************** ©  महेश भा. रायखेलकर
Image
तथाकथित समाजसेवक  चला होवू द्या हवा, चला होवू द्या हवा मी करतो समाजसेवा, मी करतो समाजसेवा माझा सत्कार व्हायलाच पाहिजे मला एखादा पुरस्कार मिळालाच पाहिचे माझे पेपर मध्ये नाव आलेच पाहिजे चला होवू द्या हवा, चला होवू द्या हवा मी करतो समाजसेवा, मी करतो समाजसेवा माझी एखाद्या पदावर वर्णी लागलीच पाहिजे माझ्या नावाचे, फोटोचे फ्लेक्स बोर्ड लागलेच पाहिजेत प्रमुख पाहुणे म्हणून मला सभारंभाला बोलवलंच पाहिजे चला होवू द्या हवा, चला होवू द्या हवा मी करतो समाजसेवा, मी करतो समाजसेवा डॉ. प्रकाश आमटे, डॉ. अभय बंग, सिंधुताई सपकाळ,  डॉ. कोल्हे दांम्पत, मेधा पाटकर, अनंत कुमार, राजेंद्र सिंग , अण्णा हजारे, कैलेश सत्याथ्री आदींनी आपले आयुष्य लावले समाजसेवेसाठी तेही निरपेक्षपणे काय आपल्यालाही असे करता येईल येईलही त्यासाठी सोडून दयावा लागेल सेवेमधला स्वार्थ © महेश भा. रायखेलकर
Image
एक देव अनेक रूपं  परवा मुलाने विचारले बाबा अल्ला   म्हणजे काय  ? मी म्हटलं....  देव ! पण नंतर विचार केला.....  खरंच तसं आहे  ? आपण तर देवाचीही विभागणी केलीय ! जसं कि ---- राम, श्रीकृष्ण, गणेश आदि देव हिंदूंचे मोहंमद पैगंबर ,आल्हा मुसलमानांचा येशू  ख्रिश्चनांचा गुरुनानक  शिखांचे महावीर जैनांचे गौतम बुद्ध बुद्धांचे आणि .... असे  अनेक खरं पाहिलं तर हि एकाच देवाची अनेक रूपं हे जेव्हा माणसाला कळेल तेव्हा धरतीवरच स्वर्ग अवतरेल ! © महेश भा. रायखेलकर
Image
हायकू कविता भावनेचा माझ्या झाला कोंडमारा फाफट पसारा                                                       ************ तुझ्या सुखात माझं सुख प्रेमाची राख ************* नम्रपणाने जी कामे होतात ताठपणाने जातात *************** एक तर हो म्हण किंवा नाही नको वणवण ************** तू काय जादू केलीस मला माहित नाही बसला गळ्याला फास ***************  सासू-सुना दोघेही भांडखोर घरात किरकिर ***************** गप्पा मारून पोट भरत नाही भरते काम करून ***************** खोटे किती बोलावे यालाही सीमा असते सतत ना खपते ***************** उगाच का अडखळत बोलतेस प्रेमाला घाबरतेस **************** रहा बिनधास्त हसा मनसोक्त खा मस्त *************** ©  महेश भा. रायखेलकर
Image
अन्याया विरुद्ध लढा कोणीतरी म्हटलंय अन्याया विरुद्ध लढा पण कस लढा? बायका-पोरांची काळजी वाटते घर-दाराची चिंता असते भविष्याची फिकीर सतावते तरी पण लढावे लागेल एखाद्या सैनिकासारखे एक सैनिक विचार करत नाही  सीमेवर लढतांना  आपल्या   शत्रूसोबत  आपल्या बायका पोरांचा, घरादाराचा, किंवा  भविष्याचा तो लढतो आपल्या देशासाठी, मातृभूमीसाठी, तिरंग्यासाठी आपल्यालाही तसेच करावे लागेल जर अंतर्गत अन्यायाविरुद्धची लढाई जिंकायची असेल  मातृभूमीच्या ऋणातून मुक्त व्हायचं असेल आंणि देशाला वैभवशाली बनवायचं असेल ©  महेश भा. रायखेलकर
Image
काही हायकू इच्छाशक्ती मध्ये प्रचंड ताकत असते काहीही साध्य होवू शकते                                                                                                ******************* गैरसमजाने माणसे खूप दुरावतात समजावून न घेतात *************** हार म्हणजे शेवट नाही प्रयत्न केलेत  पाहिजे ***************** खेळात हार जीत तर होणारच खेळण्याचा आनंद फारच ******************** आपली शक्तीस्थाने पहिले ओळखा अगदी बारकाईने **************** रिकामं डोकं सैतानाचे घर काहीतरी कर ************** जात- पात मानू नका माणुसकीचा घात ************** कामा मध्ये मन गुंतवा यशाची हवा ************* आळस द्या सोडून पुरता यशा करता ********** एकमेकांचे पाय खेचू नका शत्रूचा धोका *************** ...
Image
काही हायकू या जगात कोणाचे कोणावाचून नाही अडत **************** जीवनात चार माणसे जोडा ताठपणा सोडा ************* दुस-याही म्हणावे कधी चांगले होईल भले ************** स्वतःबद्धल चांगला विचार करा परक्यांना का विचारा **************** दुस-याचा हक्क हिरावू नका सांगतो चोर चक्क ************** संसारात तडजोड केली पाहिजे मीपणा सोड ************* हसरा माणूस चांगला दिसतो दुःख लपवितो ************ निखळ करमणूक घालवून टाकते मनाची दमणूक ************* संसार एकटाचा नसतो दोघांचा असतो कधीकधी  त्यातील एकच सारखा मरतो ****************** संसार वेलीवर उमलते  फूल सुखाची चाहूल **************** © महेश भा. रायखेलकर 
Image
काही हायकू चांगल्या गोष्टीचे जरूर कौतुक करावे                                                                                                               हात आखडून न घ्यावे                                                                                                               ***************** प्रत्येक धर्म/ जातीचा आदर करावा...
Image
काही हायकू तू दिसतेस अगदी फुलासारखी काट्यात का येतेस *************** माणूस अपमान विसरू शकत नाही   राखावा मान   ************* संकटातच खरी कसोटी लागते सुखाचे सर्व वाटेकरी                                                                                 *************** टिका सहन करायला शिका निघा तावूनसुलाखून **************** दुस-याला आपला फायदा उठवू देवू नका होईल वांदा ****************** लक्षापासून विचलित होवू नका असंख्य  अडथळे वाटेत ******************* स्वप्न मोठी असावीत जागेपणी पहावीत ****************** संकल्प नुसते कागदावर नसावेत अमलात आणावेत **************** अहंकारी माणूस आंधळा असतो स्वतःलाच पुजतो ************** शब्द बाणासारखा एकदा सुटला नाही परतला *************** © महेश भा. रायखेलकर