Posts

Showing posts from August, 2017
Image
हायकू कविता जो तो आहे येथे शहाणा काहीही म्हणा                                                                                                ************* तूच नाहीस तर कसली गंमत आपली पंगत ************** कोण कसं वागेल काही सांगता येत नाही मन चलबिचल ****************** रोज तेच तेच करून येतो कंटाळा पाहिजे विरंगुळा ***************** माझे तुझे नाही पटत चल कोर्टात **************** मीच का सतत चांगले वागावे गोत्यात यावे ***************** सतत अशी भांडू नकोस होतो त्रास ****************** मीच का माघार घेवू कमीपणा मलाच का ******************* चाळीशी आली की चष्मा लागतो चौफेर पहातो ******************* रामराज्य येणे शक्य नाही सरकारचे रडगाणे ******************** © महेश भा. रायखेल...
Image
काही हायकू  दुस-याच्या घरात नको ढवळाढवळ होईल खळबळ *************** कामात दिरंगाई केली असता खाव्यालागतील खस्ता ***************** खात्री करा मग बोला नको पाणउतारा ****************** तुलाच काय मलाही माहित नाही असे काही ****************** कधी काहीही होवू शकतं धैर्य खचतं ******************* मीच काय कोणीही सांगेन त्यात काय ******************* आपलं काय चुकतंय ते बघा काहीतरीच काय ******************* कोणीही उठून काहीही करा लोकशाहीचा मारा ******************* आजकाल पुढारी झालेत फार कार्यकर्ते सुमार ******************** राजकारणात सर्व सोंगें करावी लागतात कलाकार नाटकात ******************* ©  महेश भा. रायखेलकर
Image
शेतकरी रक्ताच्या घामाचे बी  जमिनीत पेरतो पावसाची वाट टक   पाहत बसतो अवकाळी ने मात्र पुरता मोडूनी जातो उभी पीकं आडवी झालेली डोळ्याने पाहतो ! म्हणतात मला मी आहे अन्नदाता आहे का हो मला कोणी त्राता मलाही वाटे चांगले दिवस यावे चार घास बायका पोरांना घालावे ! सावकार काढतो मला पिळुनी कर्जातच जातो मी मरुनी कसे आहात तुम्ही सर्व  धोरणी पोटभर खाउनी झोपता घोरुणी ! मी अन्नदाता तर का मी उपाशी ? माझाच घास पळवण्यास का सर्व अधाशी ? मी श्रमदाता  जर मी कष्टकरी माझ्याच नाशिबी का सदाच मीठभाकरी ? अंगावर बायकोच्या माझ्या फाटक लुगडं नेहमीच पोर माझ अर्ध नागडं मी पांघरे  ओबढधोबड घोंगड साला आमचं नशिबच लंगड ! सरकार आमचे मायबाप कवडीमोलाचे योजनेचे पदरात माप डोस्कं चालवुनी करा असा अचार ज्यामुळे होणार नाही मी लाचार ! नका नका पाहू माझा असा अंत ज्वालामुखीला नका करू वर वर शांत झाला जर सर्वाचा कडेलोट मोडुनी पडेल तुमच्या सत्तेचा सारीपाट ! मोडुनी पडेल तुमच्या सत्तेचा सारीपाट !! ©  महेश भा. रायखेलकर  ...
Image
डे प्रेम व्यक्त करण्यासाठी ' व्हॅलेटाईन- डे" लागतो नल-दमयंती च्या तरल प्रेमाला चक्क आम्ही विसरतो मैत्रीची महती साठी 'फ्रेइण्डशिप- डे' लागतो कृष्ण-सुदामाच्या निर्व्याज मैत्रीला  चक्क आम्ही विसरतो आई वरच्या प्रेमासाठी ' मदर्स-डे' लागतो साने गुरुजींच्या श्यामच्या- आई ला चक्क आम्ही विसरतो बापासाठी  आम्ही 'फादर्स- डे' साजरा करतो म्हातारपणी त्याला आधार द्यायला मात्र चक्क आम्ही विसरतो फुलांची देवाणघेवाण साठी आम्हाला रोझ-डे लागतो अंगणातील पारिजातकाचा सुगंध घ्यायला चक्क आम्ही विसरतो जिभेचे चोचले पुरवायला 'चॉकलेट-डे ' लागतो नात्यातील गोडवा राखण्यास चक्क आम्ही विसरतो अश्याप्रकारे सगळ्या 'डे' चे 'सेलिब्रेशन' आम्ही करतो आपल्या परंपरागत उत्सवांना मात्र चक्क आम्ही विसरतो © महेश भा . रायखेलकर   
Image
फेसबुक जन्म हि  फेसबुकवर मृत्यू हि फेसबुकवर आनंद फेसबुकवर आणि दुःख हि फेसबुकवर ! प्रेम हि फेसबुकवर प्रेमभंग हि  फेसबुकवर मैत्री हि  फेसबुकवर आणि शत्रुत्व हि  फेसबुकवर ! खेळ हि  फेसबुकवर मेळ हि फेसबुकवर समाजकारण फेसबुकवर आणि राजकारण हि  फेसबुकवर ! देशप्रेम फेसबुकवर देशद्रोह हि फेसबुकवर शान हि फेसबुकवर  आणि अपमान हि  फेसबुकवर ! जाहिरात फेसबुकवर लाखोली हि  फेसबुकवर वाढदिवस फेसबुकवर आणि  मरणदिवस हि  फेसबुकवर ! नोकरी हि फेसबुकवर व्यवसाय हि  फेसबुकवर छोकरा हि  फेसबुकवर आणि  छोकरी हि   फेसबुकवर ! नेते  हि  फेसबुकवर मते  हि   फेसबुकवर उदयोगि फेसबुकवर आणि  निरुदयोगि हि  फेसबुकवर ! छंदी हि  फेसबुकवर मंदी हि   फेसबुकवर आवड हि...