Posts

Showing posts from March, 2017
Image
वजन  वजन,  वजन,  रे वजन कमी हो, कमी हो,  तू कमी हो वाढतांना मणा-मणाने तु रे वाढतोस कमी होतांना मात्र कणा-कणाने तू कमी होतोस  वजन,  वजन,  रे वजन कमी हो, कमी हो,  तू कमी हो तू कमी व्हावास म्हणून डायट मी करतोय  तेलकट-तुपकट,गॉड, जास्त खाण्याचं मी टाळतोय  वजन,  वजन,  रे वजन कमी हो, कमी हो,  तू कमी हो घामाघूम होईपर्यंत व्यायाम मी करतो कधी सुर्यनमस्कार कधी भर-भर चालतो  वजन,  वजन,  रे वजन कमी हो, कमी हो,  तू कमी हो 'तब्येत उतरलीय' म्हटलं कोणी की   फार छान वाटतं  'जाड्या' कोणी म्हटलं की  मनाला फार रे लागतं  म्हणून तुला रे  सांगतोय  वजन,  वजन,  रे वजन  कमी हो, कमी हो,  तू कमी हो दर १५ दिवसाला तूला मी तोलतो तू कमी झालास की खुश  मी होतो वजन,  वजन,  रे वजन  कमी हो, कमी हो,  तू कमी हो अधून-मधून आरशात पोट माझे बघतो बायकोला कमी झालंय का? असे   सारखे विचारतो वजन, ...
Image
युती कमळ म्हणे धनुष्याला आपण दोघे भाऊ भाऊ चल दोघे मिळुनी सत्तेचा मेवा खाऊ ! निवडणुका आधी मोडली आपण युती बघितली  सत्ता येते का  एकहाती ! प्रचारात केली एजमेकावंर  येथेच्छ चिखलफेक जनतेसाठी होती ती एक धूळफेक ! काढली एक दुस-यांची उकरूनिया पाप जनतेच्या डॉकयाला दिला पुरता आपण ताप ! पारदर्शकता, मराठी अस्मिता असे  वापरले  मोठं -मोठे  शब्द तरी माहित नाही जनतेने का द्यावा असा प्रतिसाद !  आता म्हणूया युती शिवाय नाही कोणताच पर्याय पहिलेच सुचायला पाहिजे होता आपणास हा रामबाण उपाय ! ऐक आता ताणू नकोस तू तुटेपर्यंत तुझा बाण राखावी आपणच आपली पत आणि शान ! थोडे कमी थोडे जास्त चाखु सत्तेचे आपण लोणी हात , घड्याळ, हत्ती , ईजिंन नको पतंग कोणी ! सत्ता आल्यानंतर परत करू एकमेकांचा दुस्वास यातून वेळ मिळाल्यास साधू राज्याचा विकास ! सांभाळ, नको सोडूस तू आमच्या राज्यावर बाण नाही सहन होत आम्हास असा केलेला  अपमान ! पाच वर्षानंतर परत वठवू असेच  पुन्हा नाटक त्याशिवाय कशी होणार जनतेची करमणूक ! चल दोघे आता ऐकू मतदारराजा...
Image
काही हायकू चारित्र्य संपले कि सारे संपते काही ना उरते ************** मुळात माणुस असतो प्रेमळ जस फणस ************** वेळ काढून एकमेकांना भेटा एकटेपणाचा  प्रचंड तोटा ******************* माणसाला भावनेला  घाला साद देईल तो प्रतिसाद **************** तंत्रज्ञानाने दूरचा माणूस जवळ आला जवळचा दूर गेला *************** माणुस एकटा राहू शकत नाही गर्दीला द्या फाटा *************** पाणी म्हणजे जीवन नका देवू टाकून जावू नका मातून ************** हळवा माणुस प्रेमळ असतो सदाच फसतो ************ ख-याला कधीच भिती नसते खोटे उघडे पडते ************ लांडीलबाडी करून मिळवलेला पैसा धरेल घसा ************ © महेश भा. रायखेलकर 
Image
काही हायकू आई-वडील हेच ईश्वर घर मंदिर                                                                                                     ********** मुलांनी अभ्यास का करावा हे ठरवा ************ संसार म्हटलं कि भांडणतंटे होणारच करू नका वचवच ************* कायदा कोन्हीही घेवू नये हातात जाल जेलात ************ डॉक्टर आणि वकिलावर विस्वास ठेवावा मनी संशय नसावा **************** गुरु हा परमेश्वरा समान  देई ज्ञान *************** आई-वडिलांचे कष्ट विसरू नका नको बुद्धी भ्रष्ट ************* तीने पैसा पाहून माझ्यावर प्रेम केलं उशीरा समजलं ************** उगाच का चिंता करावी आशा  असावी ************* सुंदर सकाळ प्रसन्न मन करतो नमन *********** © महेश भा....
Image
पहिले काढूया सेल्फी  मंदिरात गेलोत देवदर्शन राहिलं बाजूला पहिले काढूया सेल्फी ! हॉटेलात गेलोत जेवण राहिलं बाजूला पहिले काढूया सेल्फी ! कुठल्या कायर्क्रमाला गेलोत मनोरंजन राहिलं बाजूला पहिले काढूया सेल्फी ! लग्नाला गेलोत अक्षता टाकायच्या दिल्या सोडून पहिले काढूया सेल्फी ! सहलीला गेलोत सहलीचा आनंद राहिला बाजूला पहिले काढूया सेल्फी ! कोणत्या स्पर्धेत भाग घेतला स्पर्धा राहिली बाजूला पहिले काढूया सेल्फी ! थोर व्यक्तीच्या भेटीत  त्यांचे विचार ऐकायचे सोडून पहिले काढूया सेल्फी ! निसर्गाच्या सानिध्यात त्याचे सौन्दर्य अनुभवायचे सोडून पहिले काढूया सेल्फी ! प्रेक्षणीय स्थळाला भेट दिली  त्याचे वैभव पाहायचे सोडून पहिले काढूया सेल्फी ! मित्रमंडळी- नातेवाईकांना खूप दिवसांनी भेटलोत सुख- दुःखाची देवाणघेवाण करायची सोडून पहिले काढूया सेल्फी ! समाजसेवा करण्यामध्ये देखील सेवा राहिली बाजूला पहिले काढूया सेल्फी ! या सेल्फीच्या नादाने पडलो इतके स्वतःच्याच प्रेमात वाटे आपल्या सारखे कोणीच नाही या जगात ! वाटे आपल्या सारखे कोणीच नाही या जगात !! ...