चला करुया आपलीच कोणी बहीण आहे अडाणी, चला बघुया घेता येईल का तिची शिकवणी ! आपलाच कोणी बांधव राहतो वस्त्रावीण उघडा, चला त्याच्या अंगात घालू नवीन कपडा ! बापासम आपल्या कोणी वृद्ध आहे उपाशी , चला देवु आपल्यातील चटणी भाकर त्याशी ! कोणी आपलीच माता होई आजाराने बेजार, चला करुया तीच्यावर औषधोपचार ! आपलीच काही लेकरं आहेत निराधार, चला बनून पालक त्यांचे देवूया आधार ! आपल्याच काही घरातील अंगणे पडलीत घाण, चला साफ करुनी त्यांना बनवूया छान ! आपल्याच काही घरातील माठ पडले कोरडी, चला टाळूया करायला पाण्याची नासाडी ! गौरवाने म्हणतो आपण `सारे विश्वच माझे घर' चला त्या दिशेने उचलूया पाऊले चार ! चला त्या दिशेने उचलूया पाऊले चार !! © महेश भा. रायखेलकर