संघ 

राष्ट्र चेतना जो जागवी तो संघ
देशद्रोहांच्या उरात बसवे जो धडकी तो संघ !

मातृभूमीचे स्वयंसेवक जे म्हणवती तो संघ
राष्ट्र पुरुष जेथे घडती तो संघ !

भगव्या ध्वजास गुरु जो मानतो तो संघ
संस्काराचे   बीज जो पेरतो तो संघ !

अखंड भारताचे स्वप्न जो पाहतो तो संघ
राष्ट्र प्रेमाचे गीत जो गातो तो संघ !

समाज संकटात धावून जो जातो तो संघ
समाज सेवा व्रत जो मानतो तो संघ

शिस्तीचे  जो पालन करतो तो संघ
मुल्य परमंपरेला पुज्य जो मानतो तो संघ !

कोणाच्याही नसे विरुद्ध तो संघ
राष्ट्र वैभवाची तळमळ जेथे शुद्ध तो संघ !
राष्ट्र वैभवाची तळमळ जेथे शुद्ध तो संघ !!

© महेश भा. रायखेलकर



Comments

Popular posts from this blog