एक जन्म दोन जीवन 

एका अंगणातले रोपटे दुस-या अंगणी लावावे
कोणी फुलूनिया यावे तर कोणी कोमेजून जावे
हे फक्त स्त्रियांच्या नशिबीच असावे
एका जन्मात दोन जीवन जगावे !

सोडावा हळुच आईचा मायेचा पदर
विसरावा बापाचा प्रेमाचा पाझर
भावंडाची हितगुज मागे पडणार
सख्यांची आठवण मनी राहणार !

सगळ्यांशी  मिळून - मिसळुन वागावे
दु:ख आपले आतल्या आत गिळावे
मानावे सर्वच गोडं  गोडं
जरी असले त्यात कडु थोडं !

झिजावे सर्वांच्याच सुखासाठी
मारावी येणा-या संकटावर काठी
स्वत:चा विचार सोडुनी द्यावा
या समईचा प्रकाश सर्वांनी घ्यावा !

संसार हा एक यज्ञासमान
जाळावे स्वत:ला त्यात समिधा बनून
उजळून टाकावा सारा अंधार
करावे स्वर्गासमान आपले घर !

स्त्रियांनो तुमचे मन फार थोर
सुखाने नांदावे त्यात दोन्ही घर
तुम्ही करता दोन कुळांचा उद्धार
यासाठी तुम्हांस सलाम त्रिवार !!

© महेश भा.  रायखेलकर 



Comments

Popular posts from this blog