Posts

Showing posts from July, 2015
Image
कर्मयोगी अरे परेमेश्वरा का वाटला आमचा हेवा म्हणुन आज नेले तु आमचीया देवा ! एक नावाडी जो देश वलव्ही ज्यांची  प्रेरणा स्फुलिंग फुलवी ! एक कर्मयोगी एक ज्ञान योगी एक विज्ञान निष्ठ एक देश जोगी ! शीर झुकावे असा एक महापुरुष ज्यांनी  अवघे खर्चिले देशासाठी आयुष्य ! ना मांडला यांनी स्वत:चा संसार जगभर केला ज्ञानाचा प्रचार ! स्वप्न पाहण्यास यांनी शिकविले देशासाठी काही  करण्यास यांनी सांगीतले ! एक दिपस्तंभ आज तोही निमला देश  सारा शोक सागरात बुडाला ! अब्दुल कलाम तुम्हां त्रिवार सलाम तुमच्या स्वप्नांचा पाठलाग हेच आमचे काम !  तुमच्या स्वप्नांचा पाठलाग हेच आमचे काम !! ©  महेश भा.  रायखेलकर 
Image
शाळा बाह्य मलाही वाटे रोज शाळेत जावे पाटी-पुस्तक वह्या मध्ये मीही रमावे ! काढावे छान सुंदर अक्षर असावे सोबत डबा आणि दप्तर ! वाचावा खडा-खडा एखादा धडा करावा तोंडपाठ गणिताचा पाढा ! घालावा  स्वच्छ  टापटीप गणवेश चमकावा बुट करून पॉलीस  ! म्हणावे राष्ट्रगीत होवुन सावधान तिरंग्याचा बाळगावा अभिमान करेन मीही रोजचा गृह्पाठ असेल मलाही कविता तोडंपाठ ! शिकुन-सवरून  खुप मोठे  व्हावे आई-बापाला सुखात मी ठेवावे ! व्हावे ह्यांचे   स्वप्न हे पुर्ण शिक्षणा वाचुन सर्वच अपुर्ण ! करा सरस्वतीला लक्ष्मीच्या जोखडातून मुक्त पिऊ  दया प्रत्येकास ज्ञानअमृत  मनसोक्त ! न्या यांच्यापर्यंत ज्ञानाचा प्रकाश उजळवतील हे देशाचे भविष्य ! उजळवतील हे देशाचे भविष्य !! ©  महेश भा.  रायखेलकर 
Image
छोटु  विचारे….  छोटु म्हणतो  या जगात चोरच नसावे मी सांगे  असे झाले तर पोलीसांनी  काय खावे छोटु विचारे आई-बाबा तुम्ही कामाला का जाता मी सांगे खाऊ खायला तुला येता-जाता छोटु सांगे बाबा खेळणी साठी ए.टी.एम. मधुन पैसे काढा मी म्हणे  त्यात भरण्यासाठी वाचावा लागतो कामाचा पाढा छोटु पुसे बाबा दारू म्हणजे काय मी सांगे दिवाळीत जी उडवली जाय छोटु विचारे  बाबा  मी तुमच्या एवढा कधी होणार मी सांगे बाळा तु माझ्यासाठी सदाच लहाण असणार छोटु विचारे बाबा देव कुठे असतो मी म्हणे तुच सांग  तो कुठे नसतो छोटु विचारे बाबा खोटं का बोलु नये मी सांगे काय बोललंय हे लक्षात ठेवाव  लागु नये छोटु पुसे बाबा रेनबो ला हात लावलं तर काय होईल मी सांगे तुझे हात सप्तरंगाने रंगुन जाईल छोटु विचारे बाबा रात्री झाडाचे पान का तोडु नये मी सांगे तुझ्यासारखे तेही झोपुन जाये असंख्य बालसुलभ प्रश्नांचे छोटु उठवे काहूर काहींचे उत्तर असते तर  काही निरुत्तर     © महेश भा. रायखेलकर