Posts

Showing posts from June, 2015
Image
निसर्ग-कोप अगर गेल्यास तु माझ्या विरुद्ध हरपुन टाकील मी तुझी शुद्ध होवुन येईल मी भुकंप प्रगतीला सुटेल तुझ्या कंप ! अगर केल्यास तु माझ्यावर मात करील तुझा अध्याय मी समाप्त येईल मी सुनामीच्या रूपाने उध्वस्त इमारती पत्ताच्या बंगल्याप्रमाणे ! अगर  केल्यास तु मला उध्वस्त नाही बसु देणार मी तुला स्वस्थ दाखवीन पावसाचे रूप अक्राळ-विक्राळ संपेल तुझ्या जीवनाचा कार्यकाळ ! अगर  केलीस तु माझी हानी नाही म्हणु शकणार तु आनंदाने गाणी देईल तुला उन्हाचा असा तडाखा उठेल तुझ्या अंगाचा पुरता भडका ! अगर पोहचवल्यास तु मला क्षती होवुन जाईल तुझी कुंठीत मती बरसेन कधी अवकाळी गारपीट करेल तुझी-पिकाची ताटातूट ! अगर केल्यास तु माझे नुकसान गळुन पडेल तुझे अवघे अवसान थंडीने टाकेल मी असे गारठुन रक्त जाईल तुझे पुर्ण गोठुन ! दिले मी तुला भर-भरून जावु नकोस तु असा मातुन केलास तु माझा सांभाळ  सगळीकडे असेल सुकाळ ! सगळीकडे असेल सुकाळ !! ©  महेश भा.  रायखेलकर 
Image
आभासी जग  सोशल मेडियावर   माझा सतत वावर घरच्यांच्या सुखदुखां:ची नसे मला खबर रात्रंदिवस चाले माझे नेटवरून चाटिंग वेळ नाही करायला सखेसोय-यांशी मीटिंग मला आवडे करायला लाईक कॉमेंट वेळेशी कामाशी नसे कोणतीही कमीटमेंट रेडीमेड माहितीसाठी वापरतो मी गुगल ज्ञानसाधनेस मारतो मी  बगल निसर्ग-सौंदर्याशी माझे काय देण-घेण हजारो चित्रांचे पाहतो एका क्लिकवर  येण-जाण कानात असत्तात सतत इअर-फोन ते सोडून दुसरे ऐकायला लागत नाही मन सतत करतो काहीएक  अपलोड-डाऊनलोड आई-बाबांशी बोलण्यास देतो काडीमोड जगाशी साधतो मी एका क्षणात संपर्क शेजा-यांशी बोलणे मानतो मी  भंपक मित्रांशी कनेक्ट मी   थ्रू  ऑनलाईन -ह्दयाची जुळतनाही पहिल्यासारखी लाईंन वॉट्स अॅपच्या  ग्रुप  मध्ये असते माझेही नाव  आपले इंप्रेशन त्याशिवाय  कसे पडणार राव  फेसबुक,  ट्विटर , अॅप्स सारखे  सतत शब्द तोंडावर  बायकोला माझ्या त्याचे कौतुक फार  पोरगं लागलं करायला फारच   कीरकीर   मोबाईलवर गेम लावले की संपली फ...
Image
जीवन-वास्तव्य कशाला वागतोस एवढा तु ताठ शेवटी जमिनीला टेकणार तुझी की रे पाठ ! कशाला वापरतोस बोलण्यात अपशब्द शेवटी  होणार तु की रे निशब्द्ध ! कशाला करतोस तु अवैध धंदे पुरणार तुला शेवटी चारच खांदे ! कशाला हवी तुला खोटी मान-प्रतीष्ठा कावळा करी तुझ्या शेवटी पिंडाला उष्टा ! कशाला जमवतोस भ्रष्ट्राचारातून  तु संपत्त्ती जाळणार तुला जरी तु करोडो-अब्जोपति ! कशाला बळकावतोस लोकांच्या तु  भूमी स्मशान रे तुझी शेवटची कर्मभूमी ! कशाला पळवतोस दुस-यांचा तोंडातला तु  घास मृत्यू आवळेल शेवटी  तुझ्या गळयाभोवती फास ! कशाला धावतोस तु ऊर फुटेपर्यंत तुझा शोक फक्त चौदा दिवसापर्यत ! करावी थोडी प्रभूची प्रार्थना नसावी  कोणतीही  असुरी कामना ! प्रेम असावे सर्वांबद्धल मना भला आहे अशी असावी जगाची धारणा ! भला आहे अशी असावी जगाची धारणा !! ©  महेश भा.  रायखेलकर