अरुणा जीवनाचा झाला पाचोळा शरीर झाले चोळामोळा तरीही लढले शर्थीने मरणाशी झुंजविले हिमतीने ! घेतला होता रुग्णसेवेचा वसा गिधाडाने पंजा मारीला असा क्षणात थिजले अवघे आयुष्य अंधारमय झाले सारे भविष्य ! होते स्वप्नात माझ्या सुंदर घर राजाराणीचा गोड संसार नियतीने घातला असा घाव मोडला अर्ध्यावरीच सारा डाव ! जरी मी असले अरुणा सखींनी दाखवली करुणा फेडु न शकणार त्यांचे उपकार ज्यांनी केली देखभाल, उपचार! जाते वरच्या न्यायालयात सांगते माझ्या आहे जे मनात ऐक माझी एवढी एक याचना नको घडवुस दुसरी अरुणा ! नको घडवुस दुसरी अरुणा !! © महेश भा. रायखेलकर