Posts

Showing posts from February, 2015
Image
वृद्धाश्रम कारे धाडिशी त्यांना तु वृद्धाश्रमास विसरलास का तु त्यांच्या श्रमास असा कसा निघालास तु रे करंटा स्वप्नांवर  त्यांचा  तु  फिरवी वरवंटा काय असे त्यांचे मोठे मागणे दोन गोड शब्द  आणी  दुखण्याचे गाराहने विसरलास का तु  त्यांचे उपकार ज्यावर  त्यांनी नाही लावला  कुठलाही  कर कसे फेडशील  त्यांचे  तु पांग जबाबदारीतुन  काढीशी तु अंग करून त्यांची अशी अधोगत्ती कशी साधणार रे तु स्वत: ची प्रगती आठव त्यांचे  हात पकडुनी आलास तु  इथवर पायरी चढुनी असा कसा विसरलास आईची अंगाई बापाची खात होतास फुकट कमाई तूच आहेस  त्यांचे कीरे प्राण काय करी असा त्यांचा अपमान घेशी कसा ऋणातुन मुक्तता करून गेलास तु नुसता मातुन नाही कसा रे आज तुला वेळ तूझ्याचसाठी खर्चिला त्यांनी सारा भूतकाळ आधार तुझारे त्यांना पाहीजे आज एवढा कशाचारे आला  तुला माज होशील  कधीतरी  तुही म्हातारा नाही त्यावर  काहीच उतारा करुनी त्यांचे असे हाल कसा   होणार तु मालामाल पा...
Image
धाव बा आता पुंडलीका धाव बा आता आन सांग आज च्या पिढीला मात्या पित्याच्या सेवे साठी साक्क्षात पांडुरंगा  उभा केला श्रावणा धाव बा आता आन सांग आज च्या पिढीला अंध आई बापाला कावडीत घालूनी तीर्थांटना तु नेला गणेशा धाव बा आता आन सांग आज च्या पिढीला आई वडिलाना  प्रदिक्क्षना घालूनी कार्तिकेय  सोबत्तचा पण जिंकला रामा धाव बा आता आन सांग आज च्या पिढीला दशरथ पित्याच्या वचनासाठी वनवासा तू गेला शिवबा धाव बा आता आन सांग आज च्या पिढीला जिजाऊ मातेच्या स्वप्ना साठी स्वराज्याचा विडा उचलला © महेश भा. रायखेलकर 
Image
जसे पेराल तसेच उगवेल  तुम्ही लोकांना संकटात मदत करा हजारो हात येतील तुम्हास मदतीस जेव्हा तुम्ही असाल संकटात यालाच म्हणतात जसे पेराल तसेच उगवेल ! तुम्ही लोकांना यशाचा मंत्र  शिकवा ते करतील तुमच्या यशाची विधात्त्याकडे कामना यालाच म्हणतात जसे पेराल तसेच उगवेल ! तुम्ही  निराधाराचा व्हा आधार जीवनात कधीच होणार नाहीत तुम्ही निराधार यालाच म्हणतात जसे पेराल तसेच उगवेल ! तुम्ही भुकेल्याला अन्न द्या अन्नदेवता असेल कायमची तुमच्यावर प्रसन्नः यालाच म्हणतात जसे पेराल तसेच उगवेल तुम्ही दुसराला आनंद द्या दुखा:ची सावली नाही पडणार तुमच्या आयुष्यावर यालाच म्हणतात जसे पेराल तसेच उगवेल ! तुम्ही लोकांस मान सन्मान द्या दुसरे होतील तुमच्या समोर विनम्र यालाच म्हणतात जसे पेराल तसेच उगवेल ! तुम्ही लोकांचा द्वेष करा  लोक पाहतील तुम्हाला  पाण्यात   यालाच म्हणतात जसे पेराल तसेच उगवेल ! जसे पेराल तसेच उगवेल !! © महेश भा. रायखेलकर