स्वीट रिव्हेंज स्वीट रिव्हेंज म्हणजे गोड बदला. तुम्ही म्हणाल बदला आणि गोड तो कसा काय ? कोणीतरी आपला जिव्हारी लागणारा अपमान करतो. आपण आतल्या आत ज्याने अपमान केला त्याबद्दल राग ठेऊन कित्येक दिवस धुमसत असतो . या अपमानाचा कधी मी बदला घेईन असे आपल्याला झाले असते. पण हि धुमस ऊर्जा म्हणून वापरली तर ? स्वतःला इतके मोठे केले कि सारे जग आपली स्तुती करण्यास बाध्य होईल. तुम्ही म्हणाल कसे ते ? आपल्याला खालील तीन उदाहरणावरून समजेल. एकदा महात्मा गांधी आपल्या कामानिमित्त दक्षिण आफ्रिकेमध्ये फर्स्ट क्लासचे तिकिटाने रेल्वेने प्रवास करत होते . त्या काळात रंगभेदामुळे काळ्या लो...