" नको तुलना एकमेकांच्या मुलांची सुंदर बाग दिसते वेगवेगळ्या फुलांची" या लेखातील शीर्षकाच्या ओळी लहान मुलांच्या बाबतीत लिहल्या असल्या तरी त्या आपल्या सर्वांना लागू होतात . प्रत्येक मुलं जस वेगवेगळे आहे आणि जेव्हा पालक आपल्या मुलांची इतर मुलांबरोबर तुलना करत असतात तेव्हा ते आपल्या मुलांवर नकळत अन्याय करत असतात. आपण देखील आपली तुलना इतरांसोबत करतो तेव्हा आपणही स्वतःवर अन्यायच करत असतो. प्रत्येक व्यक्ती हा निराळा आहे. त्याचे जीवनातील प्राधान्यनक्रम वेगळे आहेत. त्याला मिळालेली परिस्थिती वेगळी आहे. प्रत्येकाचे स्वभाव वेगळे आहेत. सुख दुःखाच्या कल्पना वेगळया आहेत. तेव्हा एकमेकांची तुलना करून कसे चालेल. आणि जरी केली तरी ती माझ्या मते न्याय ठरेल असेही नाही. तेव्हा तुलनेचा विचार हा व्यर्थ आहे. अगदी तुलना करावयाचीच असेल तर स्वतः ची स्वतःचीच करा. आपल्या आत्तापर्यंतच्या जगलेल्या आयुष्याचे सिंहावलोकन करा. नक्कीच तुम्हाला बदल जाणवलेला दिसेल. अगोदर तुम्ही कोणावर तरी अवलंबून होतात आज कोणीतरी तुमच्यावर अवलंबून असेल. आपल्या जाणीवा आधीपेक्षा अधिक सजग झालेल्या असतील. वागण्या बोल...