"सोशल मीडिया आणि आपण" सोशल मीडियाने आपलं रोजचं जगणं व्यापून टाकलेले आहे. व्हाट्सअँप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, युट्युब हे शब्द परवलीचे झाले आहेत. रोजचा काहीना काही वेळ आपण यावर घालवतच असतो. काही वेळ ठीक आहे पण वेळेला बंधन नसेल तर?. कामाची महत्वाची वेळ यासाठी जात असेल तर ?. याचे व्यसनच लागले असेल तर , म्हणजे मी माझा पूर्ण दिवस किंवा दिवसातील जास्तीत जास्त वेळ यासाठी देत असेल तर ? या तर तर च्या गोष्टी धोक्याच्या आहेत. दिवसभराच्या कामाच्या ताणातून थोडा विरुंगुळा म्हणून सोशल मीडियाचा वापर यात काही वावगे नाही. पण तासोंतास याचा वापर करणे म्हणजे वेळेचा अपव्यय होय. आणि याचे व्यसनच लागले असेल तर वेळीच यातून बाहेर पडणे हिताचे ठरते. जेवढा याचा अतिवापर तेवढे याचे व्यसन लागण्याची शक्यता जास्त. याचे व्यसन लागलेल्या व्यक्तीचे सोशल मीडिया हेच जग बनते. तो माणसांपासून अलिप्त राहतो...