मनाचा दसरा कधी काढलाय ? नवरात्र , दसरा जवळ येतोय . घरोघरी या निमित्ताने साफसफाई जोरात चालू आहे. वर्षभर घरात सासलेली घाण , जळमटे , टाकाऊ सामान आपण या वेळी बाहेर टाकतो . याने होत काय तर घर स्वच्छ व सुंदर दिसतं . नवीन एखादी वस्तू घेतली जी या व पुढे येणाऱ्या दिवाळी सणा निमित्त घेतली देखील जाते तिला निरुपयोगी वस्तू बाहेर गेल्याने मुबलक जागा मिळते . घर मोकळा श्वास घेतं. हे आपण सर्व दरवर्षी नियमीत करतो. हे झालं घराचं पण मनाचे काय ? कधी आपण ते स्वच्छ केलंय ? कधी त्यात साठलेली जळमटं आपण काढलीत ? कधी त्यात नीटसं डोकावून पाहिलंय ? याचे उत्तर नाही असंच असेल . स्वच्छ घरात बुरसट , राग, व्देष, ईर्षा, विषारी स्पर्धा युक्त मनाची माणसे आनंदी कशी राहू शकतील. मागील एखाद्या वाईट घट...