अध्यात्म आणि आपण आजच्या आधुनिक जगात अध्यात्मिक असणे हे बुरसटलेपणाचे, मागासलेपणाचे लक्षण समजले जाते. असाही दृढ समज आहे कि अध्यात्मच्याकडे वयाची ६५ , ७० ओलांडल्यानंतर वळायचे असते. तसेच असाही गैरसमज आहे अध्यात्मिक होणे म्हणजे सगळे सोडून देणे. भगवी वस्त्रे परिधान करणे. हे सर्व चुकीचे मतप्रवाह आहेत. अध्यात्मिक होणे म्हणजे आधुनिकतेची कास सोडणे, तंत्रज्ञान न वापरणे , विज्ञानाच्या संकल्पना नाकारणे , अंधश्रद्धेला खतपाणी घालणे , सगळे सोडून देणे असा कदापि होत नाही. जेथे विज्ञान संपते तेथे अध्यात्म सुरु होते . आजही विज्ञानाला काही गोष्टीचा उलगडा ...