डायरीतील बारा पाने मी मागील काही वर्षापासून पुढील वर्षातील कामाचे नियोजन काही संकल्प वर्षाच्या शेवटच्या दिवशी एका डायरीत लिहून ठेवतो . यात कौटूंबीक , वैयक्तिक, व्यवसायीक , आर्थिक , खरेदी अशी वर्गवारी केलेली असते . दर महिन्यात यावर नजर टाकून व त्या त्या महिन्याची कामाची यादी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी तयार करतो ज्यात आधी नियोजन केलेल्या काही गोष्टीचा समावेश केलेला असतो . यावर्षी यात अजून एक गोष्ट जमा केली ती म्हणजे त्या त्या महिन्याच्या कामाच्या यादीच्या मागच्या बाजूला त्या महिन्यात कोणती कामे झाली , काही विशेष घटना हे बाराही महिने लिहीत गेलो आणि आता वर्षीच्या शेवटी जेव्हा हि डायरी मी वाचतोय तेव्हा एक एक घटनेचा पदर माझ्या समोरून सरकत जातोय . लहान लहान गोष्टीची जसे कि हुरडा पार्टी असेल , वाढदिवस साजरा करणे असेल , एखादा लेख पेपर मध्ये छापून आलेला असेल , एखादी ट्रिप केलीली असेल , एखाद्या कवी संमेलनात भाग घेतला असेल , मुलाने एकाद्या स्पर्धेमध्ये भाग ...