Posts

Showing posts from February, 2019
Image
गजल वृत्त - मंदाकिनी   (गा गा ल गा गा गा ल गा गा गा ल गा गा गा ल गा) तू सांग वेडे  काय आहे  तुज मनी  आता तरी  ना प्रेम माझे पोरके  व्हावे  जनीं आता तरी  केल्यास तू वेडया  अती खोटया लढाया या जगी  खोटयास नाही मोल घे तू जाणुनी आता तरी  बा विठ्ठला सोडव तुझ्या भक्तास या जाचातुनी  त्यांच्या  अश्रूंचा, वेदनेचा हो  धनी आता तरी सारे ठरावे  पावसा  का रे तुझ्या येण्यापरी  घे धाव, ये उमदा  असा तू  बरसुनी आता तरी झालास तू रे  फार मोठा माणसा आता जरी मागे वळूनी  तू पहा   त्या  पाय-या आता तरी  ©   महेश भा. रायखेलकर 
Image
गजल वृत्त : वियदगंगा... ( लगागागा लगागागा लगागागा लगागागा)  तुला मी सांगतो  तू अप्सरा  माझीच   आताही  तुझ्यासाठीच   होतो  जीव कासावीस  आताही  मला जाणीव आहे  आपल्या   श्रीमंत  प्रेमाची  तुझा तो त्याग केलेला मला अनमोल  आताही                     कितीदा   वादळा संगे  लढुनी  प्रेम जिंकावे  तुला आणी मला त्या  भावनेचे मोल आताही                  कधी प्रेमात दोघे भांडलो  लाडात त्या वेळी  मला  आणी तुला  त्या नाटकाची  ओढ आताही तुला माहीत आहे मी तुझ्या साथीस  केव्हाही  मला माहीत आहे तूच  माझा जीव   आताही ©  महेश भा. रायखेलकर