Posts

Showing posts from April, 2017
Image
काही हायकू फुकटचा सल्ला का मी देवू दे खावू ************** तुझा नाद मला नडला उगाच वाद ***************** प्रेमात त्याग करावा लागतो लागते आग ***************** वाट लावलीस माझ्या जीवनाची भेट प्रेमाची ******************* तोंडात येईल ते बोलून टाकले काय वाटले ******************* घेतलं तसं दिलं पाहिजे होतं जसं *******************  घडाळ्याच्या तालावर चालते काम गाळा घाम ******************* वाणी असावी सदाच मधुर नाती जपावी ******************** जीवनात अनेक टप्पे येतात सारखी नसतात ******************* एकच सांगतो तू पहिली मी पाहीली ********************* ©  महेश भा. रायखेलकर
Image
काही हायकू मला कोणाचा सल्ला नकोय कोण देतोय                                                                                               ************** उगाच शांत बसुन रहा काय होतंय पहा                                                                                                ************* कशाला हव्यात नसत्या भानगडी हाताची घडी ************** दुस-याची निंदानालस्ती करू नका जिरेल मस्ती ****************** तुझ्या डो...
Image
अपॆक्षा   खा, खा म्हणून किती खाणार रे  घोटाळेबाजांनो जनाची नाहीतर मनाची थोड़ी लाज वाटली पाहिजे भाषा, प्रांत, धर्म, जात  भेद सारे विसरुनी 'भारतीय' बनुनी या देशात सर्वांनी राहिले पाहिजे नुकतेच यशाची स्वप्ने पाहू नकोस रे  तू  याकामी प्रयत्नांची पराकाष्टा केलीस तू  पाहिजे जे हात शिवतील आमच्या आया-बहिणींच्या अब्रूला ते हात मुळातून कलम केलेत पाहिजे नवस सायास गंडे दोरे बांधून उपयोग काय देवाठायी मनात भक्तीचा भाव असला पाहिजे सूर्याची प्रखरता अंगी असून भागणार नाही चंद्राची शीतलता अंगी भिनवली पाहिचे सरकारच  सर्व काही करणार म्हणून चालणार नाही आपलेही थोडे काही योगदान देशापायी असले पाहिजे ©  महेश भा. रायखेलकर
Image
काही हायकू मुली वाचवा मुली शिकवा देश घडवा                                                                                                ********** एक स्त्री करी दोन घरांचा उद्धार  करूया स्त्रीजन्माचा स्वीकार                                                                                                ********************* नात्यात संशय असू नये करेल प्रलय ******************* लग्नामुळे दोन घराणी एकत्र ये...
Image
   हायकू  १. कोण म्हणतो प्रेमभंगाने    माणूस संपून जातो ?     नंतर आयुष्यभर प्रेमच तो पेरतो २. जर मनात असेल 'नाही '     तर 'हो' का म्हणायच ?     नंतर मग  स्वतःलाच छळायचं ३.  नाही म्हणलं कोणी      होत नाही अपमान      इतरांच्या  मताचा राखावा  मान ४. दिवाळीचा झगमटावर     खूप खर्च होतो     काय  तो मनात प्रकाश पाडून  जातो ? ५. स्वर्ग कसा असतो     कोणालाही माहित नाही     मरायला कोणीही तयार नसतो ६.   कायदा लंगडा न्यायदेवता आंधळी      जेल मध्ये मस्त      गुन्हेगार खाई पुरणपोळी ७. कोणी  कर्ज बुडवून पळतो      कर्ज माफी साठी  बँकेच्या      रांगेत शेतकरी मरतो ८. मी पडलो     कवितेच्या प्रेमात     बायको घेईना घरात ९. लग्नाच्या गाठी म्हणे    स्वर्गात बांधल्या जातात    का...