सैनिकहो तुमच्यासाठी देशाच्या सीमेचे करता तुम्ही रक्षण म्हणुन आम्ही उपभोगु शकतो चार आनंदाचे क्षण ! प्रतिकूल परीस्थितीशी करता तुम्ही सामना आहे आदर तुमच्याबद्धल आमचीया मना ! कुटुंबापासून दूरदेशी असता तुम्ही तैनात राहू शकतो आम्ही त्यामुळे मुलाबाळांसोबत घरात, सुखात ! वेळप्रसंगी प्राणाचे करिता तुम्ही बलिदान यास्तव देशाचे अढळ आहे जगात स्थान ! पराक्रमी आणि आहात तुम्ही शूरवीर शत्रूची करावी आम्ही कशाला फिकीर ! भारतमाता आहे तुमच्यामुळे सुरक्षित जन-गण-मनाचे स्थान राहणार अबाधीत ! आहोत आम्ही पक्के हे जाणून देश संकटात पडला कि येणार तुम्ही धावून ! आज आम्ही तुम्हाला देतो एक वचन तुमच्यासम आम्हीही वाढवू देशाची आन- बान - शान ! तुमच्यासम आम्हीही वाढवू देशाची आन- बान - शान !! © महेश भा. रायखेलकर