Posts

Showing posts from November, 2015
Image
सरकार सर्वंकाहि करणार  "स्वच्छ्ता  राखा" हे देखील सरकारनेच सांगावे आम्ही मात्र सगळीकडे घाण करून ठेवावे ! "मुली वाचवा" हे  देखील सरकारनेच सांगावे आम्ही मात्र लग्नासाठी मुली मिळत नाहीत म्हणून नुसते बोंबलावे! "झाडे लावा झाडे जगवा" हे देखील सरकारनेच सांगावे आम्ही मात्र झाडाच्या सावलीत पत्ते कुटत बसावे ! "वाहतुकीचे नियम पाळा" हे देखील सरकारनेच सांगावे आम्ही मात्र घरचाच रस्ता समजून बिनधास्त वाहन हाकावे ! "रक्त-नेत्र-देह दान करा" हे देखील सरकारनेच सांगावे आम्ही मात्र नुसते घेण्यासाठी हात पसरावे ! "कर भरा" हे देखील सरकारनेच सांगावे आम्ही मात्र काळ्याचे पांढरे करण्यात स्वताला गुंतवावे! "योग- व्यायाम करा" हे देखील सरकारनेच सांगावे आम्ही मात्र  शरीराचे चोचले पुरवत राहावे ! "हुंडा घेवू देवू नका" हे देखील सरकारनेच सांगावे आम्ही मात्र त्यासाठी मुलीला छळावे ! "मतदान करा" हे देखील सरकारनेच सांगावे आम्ही मात्र नेत्यांच्या नावे बोटे मोडत बसावे ! "पाणी वाचवा" हे देखील सरकारनेच ...
Image
आली  आली   दिवाळी  आली आली दिवाळी आनंदाची ती मांदियाळी अंगणात असेल सुबक रांगोळी करुया अभ्यंगस्नान उठून  पहाटेच्या वेळी ! चिवडा- लाडू, शेवचा असेल बेत खास त्यावर खमंग चकल्याची रास करंजी, अनारसे, शंकरपाळी  असतील सोबत घरोघरी फराळाची  तयारी चालू जोरात ! फटाक्यांची होईल अतिषबाजी बालगोपाल नाचतील  उडवीत फुलबाजी प्रकाशाचा असेल लखलखाट उटणं ,अत्तर,साबणाच्या सुगंधाची पसरेल  लाट ! वस्त्र,अलंकाराची असेल रेलचेल पाहुण्यांची आगमनाची लागेल चाहूल बहिण ओवाळील भाऊरायास पती-पत्नी साठी पाडवा दिवस खास ! लक्ष्मी चे केले जाईल पूजन वडीलधारी  देती आशिर्वाद करता, त्यांना नमन आप्त मित्र भेटतील एकमेकांना देतील आनंदाचा नजराणा एक दुस-यांना ! सौख्य,आनंद, आरोग्य संपन्न जावो ही दिवाळी ज्ञान-प्रकाशाने उजळूया अज्ञानाची रात्र काळी सर्वजण मिळून करू हा सण  साजरा चहू  दिशा उधळू आनंद सारा ! चहू  दिशा उधळू आनंद सारा  !! ©  महेश भा.   रायखेलकर