Posts

Showing posts from August, 2015
Image
माझी बहीण बहीण  माझी बहीण बहीण आम्हां  भावंडातील ती 'वीण' कीती जरी काम केले  चेह-यावर नसे तिच्या 'शीण' ! माझी बहीण बहीण सरले तिच्या सोबत लहानपण तिच्या मायेचे जन्मभर असे माझ्यावर ऋण ! माझी बहीण बहीण एका घरची मुलगी,  दुस-याची सून मागणे देवाकडे एकच रहावी सदा सुखातं , हसूनं  ! माझी बहीण बहीण बांधे राखी अन ओवाळे मज जगाच्या पाठीवर यासम बंधन नसे कुठले दूज ! माझी बहीण बहीण सदा तत्पर करायला मदत तिच्या शिवाय अपूर्ण कोणत्याही सोहळ्याचा क्षण ! माझी बहीण बहीण राहावी नात्याची  भक्कम आणं  न होणार कुठल्याही परिस्थितीत नाते हे आमचे क्षीण ! माझी बहीण बहीण जोपर्यंत कुडीत  माझ्या प्राण करेल कोणत्याही संकटापासून तीचे सदाच मी रक्षण ! तीचे सदाच मी रक्षण!! ©  महेश   भा. रायखेलकर 
Image
जीवन गीत झाले गेले सारे विसरून जाऊया जीवनाचे  गीत पुन्हा गाऊया किती दिवस मनात कुढणार शरीराचे किती हाल करणार काही गोष्टी नशिबावर सोडूया आत्ताचा क्षण भरभरून जगूया एखादी गोष्ट आपल्या हातात नसते जे व्हायचे ते शेवटी होतच असते भविष्याची चिंता करणे आज सोडूया वर्तमानाचा  पूर्णपणे आनंद लुटूया प्रत्येक बाब मनासारखी न होणार काही चांगले तर काही वाईटही घडणार चांगल्या कर्मावर विश्वास ठेऊया बाकीचा भार सारा देवावर सोपवूया इच्छांना कोणतीच मर्यादा नसते मनाला थोडे आवरायचे असते हलकं हलकं होता येईल का हे पाहूया पतंगा सारखे हवेत मजेत उडूया झाले गेले सारे विसरून जाऊया जीवनाचे  गीत पुन्हा गाऊया ©  महेश भा.  रायखेलकर