सुर्यपुत्र असुनी खरा मी सुर्याचा पुत्र जन्मभर हिणवले म्हणूनी सूतपुत्र ! कुंतीने मला जन्मतः त्यागिला राधिका मातेने सांभाळ माझा केला ! शोण लहान बंधू वृषाली असे पत्नी दुय्रोधनाने गौरविले करुनी अंगदेशीचा अधिपती ! दुय्रोधन मित्राचे माझ्यावर फार उपकार मृत्युचे दान देवुन मी ते फेडणार ! कृष्ण म्हणे माझी बाजु आहे अधर्म खाल्या मिठाला जागणे हाच माझा धर्म ! या युगातला मी श्रेष्ठ धनुर्धारी गांडीव जरी असले अर्जुनाच्या करी ! कवचकुंडलाचे मला वरदान इंद्र प्रत्यक्ष मागतो त्याचे दान ! राहिलो असतो बनुनी पांडवाचा जेष्ठ भ्राता भाग्यासमोर दीन मी जरी मी श्रेष्ठ दाता ! पदरात टाकीयेले नियतीने असे चुकीचे दान जन्मभर करावी लागली अधर्माची पाठराखण ! परशुरामाच्या शापाचा असे मी धनी युद्धात रथाचे चाक गिळे धरणी ! सोड सोड अर्जुना सोड रे बाण कृष्णासमोर मृत्यु येणे हा भाग्याचा क्षण ! कृष्णासमोर मृत्यु येणे हा भाग्याचा क्षण !! © महेश भा. रायखेलकर