Posts

Showing posts from March, 2025
Image
" या ऊर्जेचे करायचे काय ?"  छावा चित्रपट आज सर्वत्र गाजतोय. कधी नव्हे ते चित्रपटगृह परत  एकदा प्रेक्षकांनी तुडूंब भरलेली  आहेत. त्याला कारण ही तसेच आहे या चित्रपटात असलेली सर्वांचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुत्राची कहाणी म्हणजेच शुरवीर छत्रपती संभाजी महाराजांची कहाणी , त्यांच्या बलिदानाची कहाणी. विकी कौशल याने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका नुसती केली नाही तर भूमिका जगणे म्हणजे काय हे त्याच्या अभिनयातून त्याने दाखवून दिले आहे. औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना जबरदस्तच. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर ज्यांनी एवढा उत्कृष्ट चित्रपट बनविला ते  अभिनंदनास पात्र आहेत.  छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचे निर्माण केलेले स्वराज्य जिथे सर्व जाती धर्माची माणसे सुखाने, आनंदाने राहू शकतील . स्त्रियांचा सन्मान केला जाईल. जाती-धर्माला कोणतीही हानी पोहोचणार नाही . त्यांचाच वसा घेतलेला त्यांचा छावा छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याची धुरा मोठया हिंमतीने गनिमाशी मूख्यत्वे औरंगजेबाची दोन हात करत सांभाळत असतात. दुर्दैवाने फितुरीमुळे त्यांना कैद होते. आणि शेवटी देश...