कॉपी बहाद्दरांनो ऐका जरा दहावी व बारावीच्या परीक्षा सुरु आहेत व पुढील काही दिवसात इतर अभ्यासक्रमाच्या परीक्षा चालू होतील. परीक्षेतील सर्वात मोठी समस्या म्हणजे त्यात होणारे कॉपीचे प्रकार. ती होऊ नये म्हणून मोठी यंत्रणा राबवली जाते. अनेक प्रयत्न केले जातात. कॉपी मुक्त परीक्षा अभियान देखील काही ठिकाणी राबविले जाते. जिल्हाधिकारी , मुख्य कार्यकारी अधिकारी सारखे वरिष्ठ अधिका-यांना यात लक्ष घालावे लागते. मोठे मनुष्यबळ त्यासाठी द्यावे लागते.पोलीस यंत्रणा यासाठी काम करते. प्रामाणिक विद्यार्थ्यांसाठी हा प्रकार हानिकारक आहे. एवढे सर्व करूनही समस्येचे पूर्णतः निवारण होत नाही असे खेदाने नमूद करावे लागेल. या समस्येमधील मूळ घटक परीक्षार्थीं/ विद्यार्थी आहे. तो जो पर्यंत मी कॉपी करणार नाही असे ठामपणे ठरवत नाही तो पर्यंत कॉपीचे प्रकार थांबणार नाहीत. विद्यार्थ्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे कि आपण परीक्षा कश्यासाठी देतो?. परीक्षा हि त्या विषयाचे त्या विद्यार्थ्याला किती आकलन झाले आहे याची एक कसोटी असते. त्या कसोटीसाठी देखील आपण कॉपी सारखा शॉ...