Posts

Showing posts from March, 2023
Image
मन निरागस हो !  रोजच्यासारखं मी आय.एम. एस. मध्ये सहावीत शिकत असलेल्या माझ्या मुलाला शाळेतुन त्याची शाळा सुटल्यानंतर  आणण्यासाठी गेलो. नेहमीप्रमाणे तो शाळेच्या समोरच्या कॉरीडॉर मध्ये कोठेच दिसला नाही. मी तेथेच उभ्या  असलेल्या त्याच्या टीचर कडे चौकशी  केली असता 'त्याचे एका मुलाशी भांडण झाले आहे व त्या दोघांनाही प्रिन्सिपल मॅडम कडे नेले आहे'  असे मला त्यांनी सांगीतले. मी  प्रिन्सिपल मॅडम च्या केबिन कडे गेलो .  केबिनच्या दारातच माझा मुलगा पार्थ त्याच्या टीचर व दुसरा एक मुलगा असे तिघे दिसले. मी त्याच्या टीचर कडे अधीक चौकशी केली असता माझ्या मुलाने त्या दुस-या  मुलाला ज्याचे नाव मीत आहे हे नंतर मला मुलाकडून कळाले तोंडात चापट मारल्याचे कळाले.  त्यामुळे मीत रडतच त्या टीचर कडे पार्थ ची तक्रार घेऊन गेला.  आता त्या दोघांनाही टीचर प्रिन्सिपल मॅडम कडे घेऊन जाण्यासाठी त्याच्या केबीन समोर उभ्या होत्या. इतक्यात मीत चे वडील जे की त्याला शाळेतून शाळा सुटल्यानंतर घेऊन जाण्यासाठीच  आले होते...