Posts

Showing posts from February, 2023
Image
              जगण्यासाठी आवश्यक जीवनमंत्र जगण्यासाठी आवश्यक जीवनमंत्र  खाली दिलेले आहेत ते जर  जीवनात उतरविले तर जीवनाचा,  आपल्या  व्यक्तीमत्वाचा विकास झाल्या शिवाय राहणार नाही.   १  वेगळं काही करा तरच वेगळं काही घडेल : जीवनात वेगळं काही घडावं असे वाटत असेल तर काही वेगळं करून  दाखवावे लागेल, की जे  या आधी कधी केलेले नाही . तेच तेच काम त्याच त्याच पद्धतीने केल्याने काही वेगळं कसे घडणार ?  तुम्हाला वेगळे निकाल पाहिजे असतील तर वेगळ्या पद्धतीने काम करावे लागेल. वेगळ्या वाटा धुंडाळाव्या लागतील . वेगळ्या क्षमता ,  ज्ञान , विचार विकसित आत्मसात करावे लागेल. आपल्या जीवना बद्धलची काही चुकीची गृहीतके बदलावी लागतील. जीवनाकडे वेगळ्या नजरेने पाहावे लागेल.  २. चिंता नको काळजी घ्या : भविष्या विषयीची, करीअर  विषयीची , मुलांविषयीची , कुटूंबाविषयीची चिंता करणे सोडा . कारण चिंता हा  एक नकारात्मक विचार आहे . जो तुमची क्षमता , ऊर्जा नष्ट करतो. चिंता  म्हणजे चिता हे लक्षात घ्या . त्यापेक्षा ...