स्पर्धेचा सकारात्मक विचार आवश्यक सध्याच्या जीवघेण्या स्पर्धेच्या युगात स्पर्धेचा सकारात्मक विचार करणे गरजेचे झाले आहे . तसे पाहिले तर कोणत्याही प्रकारची स्पर्धा अस्तित्वात नाही. हा एक आपण केलेला विचार आहे, जोकि आपल्या जीवनात ताण-तणाव निर्माण करत असतो. आपण नेहमी इतरांशी तुलना करत असतो . त्यांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो . पण आपण या जगात इतरांशी तुलना करण्यासाठी जन्माला आलेलो नाहीत. जर स्पर्धा करावयाची असेल तर स्वतःशी करा. विचार करा की आधी मी काय होतो आणि आता काय आहे. नक्कीच तुम्ही काही मिळविले असेल. आधी तुम्ही नोकरी करत असाल आता तुम्ही नोकरी देणारे झाले असाल . आधी तुम्ही कोणावर अवलंबून असाल आता कोणीतरी तुमच्यावर अवलंबून असेल. आधी तुम्ही घेणारे असाल आता देणारे झाले असाल. आधीपेक्षा तुमच्या विचारांचा , बुद्धीचा , अनुभवांचा विकास झालेला असेल. तेव्हा स्पर्धा कोठे आहे ? आजही सर्वत...