मर्द को दर्द नही होता 'मर्द को दर्द नही होता' अमिताभच्या एका हिंदी चित्रपटातील गाजलेला डायलॉग. हाच डायलॉग मला एका डॉक्टरांनीही ऐकवला बहुतेक तेही अमिताभ प्रेमी असावेत जेव्हा मी त्यांच्याकडे मागे एकदा एका शाररिक पीडेच्या उपचारासाठी गेलो होतो. खरच मर्द म्हणजे पुरुषाला दुःख होत नाही? तो माणूस नाहीये ? त्याला हृद्य, मन नाहीये ? . निर्सगतः स्त्री हि कोमल मनाचीच व पुरुष हे कणखर मनाचेच अशी स्त्री व पुरुषाची व्याख्या केली आहे. कदाचित शारीरिक क्षमतेचा त्याचा पाया असेल. एखादा पुरुष रडायला लागला कि 'काय बायकासारखा रडतो' अशी त्याची हेटाळणी केली जाते. तो कोणत्या गोष्टीला भीत असेल तर काय 'बायकासारखा भितो' असे शब्द त्यास ऐकवले जातात. म्हणजे भीती, वेदना, दुःख, निराशा या भावना मोकळेपणाने व्यक्त पुरुषाने करावयाच्या नाहीत असा अलिखित नियम घालून दिला गेला आहे . बिचारा पुरुष बाकी कोणते नियम एखादयावेळेस मोडेल पण हा नाही व वर त्याला फिल्मी डायलॉगचे आवरणं पण घालेल 'मर्द को दर्द नही होता'....