गुलमोहर रणरणत्या उन्हात फुलतो गुलमोहर त्याच्या जगण्याची पसरावी चहूकडे लहर लाल-पिवळी फुले दिसतात सुंदर निसर्गाला आपली न लागावी नजर सावली गुलमोहराची किती अल्हाददायक उन्हातल्या रस्त्यावरच्या वाटसरूंना उपकारक मनातल्या स्वप्नांचा फुलावा गुलमोहर सदाच असावी ! आशादायक नजर !! सदाच असावी ! आशादायक नजर !! © महेश भा. रायखेलकर