Posts

Showing posts from November, 2016
Image
लहानपण देगा देवा ...  देवा तुझ्याकडे मागतो एक छोटसं मागणं कर मला परत  एकदा  लहान असेल निर्व्याज, निर्मळ, सुंदर मन नसेल वासना, असूया, इर्षेची त्यात घाण ! घालेल मी कोणताही पेहराव फॅशनची नसेल कसलीच हाव झाली जरी मित्रांसोबत भांडणे आणि कट्टी थोड्यावेळातच जमून जाईल आमची पुन्हा गट्टी ! नसेल घड्याळ्याच्या काट्यावरची कसरत खेळत घालवील दिवस रमत-गमत नसेल कोणतीच माझ्यावर जबाबदारी आयुष्य असेल ते फारच भारी ! नसेल कोणती चिंता आणि घोर रंगवेन मी छान चित्रातील मोर जरी कधी बसलो मी रुसुन हट्ट पुरवला की बघेन हसून ! नसेल कोणतीच स्पर्धा ही जीवघेणी नाचत म्हणीन मी बडबड गाणी सगळं जग वाटेल मला छान-छान रमून जाईल त्यात माझे बालपण ! सगळेच करतील माझा लाड लाडाने आई-बाबा म्हणतील आहे मी लबाड नाही लागणार मला मान आणि सन्मान माहित नसेल मला काय असतो अपमान ! नसेल जाती-पातीचा मनात विचार गरीबी-श्रीमंती ना पडणार वागण्यावर  असर दंगा-मस्ती करण्यास मिळाले सवंगडी चार आनंदाचा सोहळा होईल साकार ! काय कामाचे देवा असले हे मोठेपण जीव माझा गेला पुरता  रे  वैतागून जग...