Posts

Showing posts from December, 2015
Image
   संघ  राष्ट्र चेतना जो जागवी तो संघ देशद्रोहांच्या उरात बसवे जो धडकी तो संघ ! मातृभूमीचे स्वयंसेवक जे म्हणवती तो संघ राष्ट्र पुरुष जेथे घडती तो संघ ! भगव्या ध्वजास गुरु जो मानतो तो संघ संस्काराचे   बीज जो पेरतो तो संघ ! अखंड भारताचे स्वप्न जो पाहतो तो संघ राष्ट्र प्रेमाचे गीत जो गातो तो संघ ! समाज संकटात धावून जो जातो तो संघ समाज सेवा व्रत जो मानतो तो संघ शिस्तीचे  जो पालन करतो तो संघ मुल्य परमंपरेला पुज्य जो मानतो तो संघ ! कोणाच्याही नसे विरुद्ध तो संघ राष्ट्र वैभवाची तळमळ जेथे शुद्ध तो संघ ! राष्ट्र वैभवाची तळमळ जेथे शुद्ध तो संघ !! ©  महेश भा. रायखेलकर