माणूस आहे मी मीही कधी कधी कंटाळतो कंटाळणाराच ना माणूस आहे मी मशीन थोड़ी आहे मीही कधी कधी चिडतो चिडणाऱच ना माणूस आहे मी मशीन थोड़ी आहे मीही कधीतरी दुखावतो दुखावणारच ना माणूस आहे मी मशीन थोड़ी आहे माझ्याही काही थॊड्या अपेक्षा असतात असणारच ना माणूस आहे मी मशीन थोड़ी आहे मीही कधी कधी निराश होतो हॊणारच ना माणूस आहे मी मशीन थोड़ी आहे मीही कधी कधी रोमांचित होतो हॊणारच ना माणूस आहे मी मशीन थोड़ी आहे मीही कधीतरी चुकतो चुकणारच ना माणूस आहे मी मशीन थोड़ी आहे माझेही कौतुक कधी व्हावेसे वाटते वाटणारच ना माणूस आहे मी मशीन थोड़ी आहे मशीन थोड़ी आहे (महेश भा. रायखेलकर)