सोबत करते माझी कविता मी एकटा कधीच नसतो सोबत करते माझी कविता मला हसविते, मला रडविते मी रुसलो कि तीही रुसते मी एकटा कधीच नसतो सोबत करते माझी कविता मला खुणविते , मला विनविते मी फुललो कि तीही फुलते मी एकटा कधीच नसतो सोबत करते माझी कविता मला मिरवीते, मला झुरविते मी थांबलो कि तीही थांबते मी एकटा कधीच नसतो सोबत करते माझी कविता मला उसविते , मला शिणविते मी भिडलो कि तीही भिडते मी एकटा कधीच नसतो सोबत करते माझी कविता मला शिकविते, मला जागविते मी भुललो कि तीही भुलते मी एकटा कधीच नसतो सोबत करते माझी कविता सोबत करते माझी कविता